मोठी बातमी! ओबीसी उपसमितीत कोणकोणत्या नेत्याची वर्णी? प्रमुख 8 मंत्र्यांचा समावेश…


पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने काल शासन निर्णय जारी करत हैदराबाद गॅझेट लागू केलं.यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या उपसमितीत राज्य सरकारच्या आठ महत्वाच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपसमितीचं अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

ओबीसी समाजासाठीच्या उपसमितीत भाजपचे ४, शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादीच्या २ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असणार आहेत. तर छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे सदस्य समितीत असणार आहेत. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम, योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेत बावनकुळेंना समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. ओबीसींचं आरक्षण हिसकवाल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसींची उपसमिती काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

समिती काय काम करणार?

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यास मान्यता दिली. हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला मागच्या दरवाज्यातून ओबीसीत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून होत आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर समिती अभ्यास करणार आहे. ओबीसींचं आरक्षण कसं सुरक्षित आहे, हे समजून सांगण्याचं काम समितीचं असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!