मोठी बातमी! दिल्ली बॉम्बस्फोटानंतर विमानतळांना धमकीचा ईमेल, सुरक्षा वाढवली पण चौकशीत….

पुणे : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याने महाराष्ट्र हाय अलर्टवर असतानाच आता,इंडिगो एअरलाइन्सच्या नोएडा फीडबॅक ईमेलवर ‘dawood@gmail.com’ वरून काल एक धमकीचा संदेश आल्याने खळबळ उडाली आहे. या संदेशात भारतीय विमानतळांवर २४ तास दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, त्रिवेंद्रम येथे हल्ला केला जाईल असं लिहिलं होतं. यानंतर तात्काळ कारवाई म्हणून विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र विमानतळावर सुरक्षा एजन्सींची बैठक बोलावण्यात आली. या धमकीच्या ईमेलच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळ परिसरात बीडीडीएसने केलेल्या व्यापक दहशतवादविरोधी आणि सुरक्षा तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळली नाही. हे प्रकरण गांभीर्याने घेत, सर्व प्रमुख विमानतळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि सुरक्षा तपासणी सुरू आहे.काल, देशातील 5 विमानतळ बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकीचा मेल आला. इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटाचे प्रकरण ताजे असल्यामुळे देशातील 5 विमानतळ स्फोटामध्ये उडवून देण्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर सविस्तर चौकशी सुरू झाली. हा मेल कुणी आणि कुठून पाठवला याचा तपास करण्यात येत आहे.
