मोठी बातमी! महायुती सरकारला लाडक्या भावांनी लावला चुना, तब्बल 12431 भावांनी घेतला 1500 रुपयांचा लाभ, कारवाई होणार?

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतुन आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी महिलांना ई -केवायसी बंधनकारक करण्यात आली असताना आता अंतर्गत भावांनीही याचा चुकीच्या पद्धतीने लाभ उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थोडे-थोडके नव्हे, तर तब्बल १२,४३१ पुरुषानी पंधराशे रुपये चा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची तरतूद आहे. ही योजना जून २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून सरकारने महिलांना ई -केवायसी बंधनकारक करण्यात आले असताना माहिती अधिकार अर्जांना दिलेल्या उत्तरातून तब्बल 12,431 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. महिला आणि बाल विकास विभागाने ही योजना राबवली आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींमध्ये १२,४३१ पुरुषांचा समावेश होता. पडताळणीनंतर त्यांना अपात्र ठरवून यादीतून वगळण्यात आले. या पुरुषांना १३ महिन्यांसाठी दरमहा १५०० रुपये याप्रमाणे एकूण २४.२४ कोटी रुपयांचा लाभ चुकीने देण्यात आला होता. या पुरुषांवर सरकार काय कारवाई करणार?त्यांच्याकडून वसुली सरकार करून घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

