मोठी बातमी! राजधानी दिल्ली स्फोटाप्रकरणी तपास यंत्रणेच्या हाती महत्वपूर्ण माहिती, तब्बल 3 तास कार…..


दिल्ली ; राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाप्रकरणी तपासामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला नसून त्यात आय वीस कार मध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फ़ोट करण्यात आला असा संशय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला आहे.या कार स्फोटाच्या तपासात तपास यंत्रणांना महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले आहेत. ज्यामुळे तपासाला गती मिळणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, स्फोट घडवण्यापूर्वी एका संशयित व्यक्तीने ही i20 कार सुनहरी मस्जिद परिसरातील पार्किंगमध्ये उभी केली होती. ही कार दुपारी 3:19 वाजता पार्किंगमध्ये आली. त्यानंतर संध्याकाळी 6:48 वाजता ती बाहेर पडली. साधारण 3 तास 29 मिनिटे ही कार पार्किंगमध्ये उभी होती. कार पार्किंगमध्ये असताना या कारचा चालक कारमधून उतरला नाही.तपास यंत्रणेच्या मते, हा कारचालक कोणाकडून तरी सूचना मिळण्याची वाट पाहत असावा किंवा कार पार्किंगमध्ये असताना स्फोटक कारमध्ये ठेवण्यात आली असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण पार्किंगमधून बाहेर निघाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत (सुमारे 6:52 वाजता) सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ मोठा स्फोट झाला.सध्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून याबद्दलची कसून चौकशी सुरु आहे.

या दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका i20 कारमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका गंभीर होता यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.

       

या संपूर्ण घटनेमागे मोठा कट असल्याचा आणि गैरकायदेशीर हालचालींचा संशय असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गैरकानूनी गतिविधियां (रोकथाम) अधिनियम (UAPA) च्या कलम 16 (दहशतवादी कृत्य) आणि कलम 18 (कट रचणे) अंतर्गत तसेच विस्फोटक अधिनियम च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!