मोठी बातमी! महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचा दिवस अखेर ठरला; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत!


पुणे : राज्यातील महानगरपालिका निवडणूकीचा निकाल लागून चार दिवस उलटून देखील अद्याप महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता महानगरपालिका मधील महापौर पदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयात काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व महानगर पालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या 22 जानेवारीला निघणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजता ही प्रक्रिया पार पडणार आहे. नगरविकास विभागाकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.

महापौर पदासाठी सर्वसाधारण पुरूष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. यावेळी मुंबईचे महापौरपद कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर परिषद सभागृहात सकाळी 11 वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.या सोडती द्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिलांसाठीचे महापौर पद निश्चित केले जाणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!