मोठी बातमी! तेजस्वी घोसाळकर मुंबईच्या महापौर होणार? महत्त्वाची माहिती आली समोर..


मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर बहुचर्चित मुंबई महापालिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई महापालिकेत महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना तेजस्वी घोसाळकर मुंबईच्या महापौर होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी मुंबईतील दहिसर प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आता त्यांना मुंबईच्या महापौरपदाचे संभाव्य उमेदवार मानले जात आहे. निवडणुकीच्या सुमारे एक महिना आधी तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. 2026 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.

तेजस्वी यांची वाढती लोकप्रियता, जनतेचा पाठिंबा आणि मजबूत राजकीय प्रभाव यामुळे त्यांना महापौरपदासाठी एक मजबूत दावेदार मानले जात आहे. मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव प्रमुखतेने विचारात घेतले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!