मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसकडून पुण्यासह राज्यात मोठी छापेमारी सुरू आहे.यामध्ये ४ डॉक्टरांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, इसिस आणि इतर संघटनांशी संबंध असल्याची शक्यता तपासली जात आहे.दिल्ली स्फोटाचे धागेदोर महाराष्ट्रात असण्याच्या संशयावरून शोध मोहीम हातात घेण्यात आली आहे. दिल्ली स्फोटाच्या आधी अटक केलेल्या चार डॉक्टरांचे महाराष्ट्रात काही संबंध आहेत का? याचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाल स्फोटानंतर महाराष्ट्रातील अनेक शहरं आणि गावांमध्ये ए टी एस ची शोध मोहीम सुरू आहे. अटक केलेले ४ डॉक्टर महाराष्ट्रात आले होते का? या अनुषंगाने एटीएसकडून तपास केला जात आहे. डॉ मुजम्मिल शकील, डॉ आदिल अहमद, डॉ अहमद सय्यद आणि डॉक्टर शाहीन शाहिद या चार जणांना देशातून विविध भागातून अटक केली आहे.इसीस, जैश- ए मोहम्मद आणि अन्सर घझवत- उल- हिंद या संघटनांशी डॉक्टरांचा संबंध असल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार “व्हाईट-कॉलर टेरर इकोसिस्टम”चा असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये ब्लास्ट झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० पेक्षा जास्त जखमी झाले होते. या स्फोटानंतर गृहमंत्रालयाकडून तात्काळ उच्चस्तरीय बैठक घेऊन आढावा घेऊन सूचना कऱण्यात आली. अटक करण्यात आलेले डॉक्टर कोणत्या कोणत्या राज्यात गेले होते, त्याचे मॅपिंगही करण्यात आले. महाराष्ट्रालाही या पार्श्वभूमीवर अलरट देण्यात आला होता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र एटीएसकडून विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. मुंब्रा परिसरात मंगळवारी छापा मारला होता. तर आज पुण्यातील कोंढवा परिसरात छापेमारी करण्यात आली.

