मोठी बातमी! महाविकास आघाडी तुटली, पुढच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार…

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे मित्रपक्षांमध्ये सध्या अस्वस्थता दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत.
यामध्ये महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. सध्या महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला देखील लागले आहेत.
असे असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा पक्ष मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी घोषित केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये महायुती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मागील पाच वर्षापासून अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासनराज सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे घोंगडं भिजत पडले आहे. आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यामुळे पक्ष तयारी करत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. ही निवडणूक महायुतीच्या बाजूने निकाल देणारी ठरली. महायुतीला पूर्णपणे एकतर्फी यश मिळाल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.