मोठी बातमी! राज्यात पुन्हा लॉकडाऊन? जीबीएसची दहशद वाढली, केंद्रीय आरोग्यमंत्री घेणार मोठा निर्णय…

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात तसा निर्णय होऊ शकतो.
सध्या राज्यासह पुण्यात जीबीएसचा कहर सूरूच आहे. पुण्यासोबत या आजाराने आता इतर जिल्ह्यात हायपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत वाढत होत चालली आहे. ग्रामीण भागात देखील काही रुग्ण आढळले आहेत. यामुळे काळजी वाढली आहे.
याबाबत प्रतापराव जाधव म्हणाले, जीबीएस आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून हा आजार काहीसा जीवघेणा ठरत आहे. जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांचे कारण कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरतोय.
तसेच जीबीएस सामान्यत व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दुषित किंवा कमी शिजलेले मांस, पाश्चर न केलेले दुग्दजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने या जीवाणूच लागण होते. यामुळे याबाबत सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. सध्या एकूण रुग्णांची संख्या 210 झाली आहे.
या संशयित रूग्णांपैकी 182 रूग्णांना जीबीएसची पुष्टी झालेले रुग्ण असल्याचे निदान झाले आहे,असे आरोग्य सेवांच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. याबाबत रोज एकाच मृत्यू होत आहे यामुळे काळजी वाढली असून काळजी घ्यावी लागणार आहे.