मोठी बातमी! मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारची मोठी घोषणा…


पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत दाखल होत केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यानंतर आंदोलकावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत देखील आता सरकारने मोठी घोषणा केली असून मराठा आंदोलकांवरी गुन्हे या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने जरांगेंचं उपोषण सोडवताना दिला होता. तो शब्द सरकारने पाळला.
मराठा आंदोलकांवरी गुन्हे या महिना अखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच महिन्यात सदर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक सोमवारी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे गुन्ह्यांचा आढावा घेतली आणि समितीपुढे प्रस्ताव सादर करतील, अशी माहिती मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. तर आंदोलन करताना किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्यासाठी सरकारने जो जीआर दिला होता. त्यावेळी मृत आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मराठा आंदोलनात मृत पावलेल्यांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!