मोठी बातमी! प्रतिशिर्डीचा संस्थापक हरपला; विलासराव देशमुखांना निवडणुकीत चारलेली धूळ


पुणे : शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रतिशिर्डी शिरगावचे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाने साई भक्तांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार (दि 24 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वा. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेतर्फे 1996 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. शिरगाव शिर्डी येथे त्यांनी साईबाबांची प्रतिशिर्डी उभी केली. अन्नछत्र उभारले. अनेक संस्था आणि संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता.

विधानपरिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांना पराभूत केल्याने प्रकाश देवळे प्रकाशझोतात आले होते. पण नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत प्रतिशिर्डीच्या विकासासाठीच स्वत:ला वाहून घेतलं होतं. देवळे यांच्या निधनामुळे प्रतिशिर्डीच्या भक्त परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!