रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! नियम मोडल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : तुम्ही वारंवार रेल्वेने प्रवास करत असाल, तर आगामी प्रवासापूर्वी हे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षितता, शिस्त आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ‘जन विश्वास कायदा, 2026’ अंतर्गत रेल्वे कायद्यातील काही दंडाच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांना मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो.
रेल्वेने लागू केलेले नियम आणि दंडाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

1. धोकादायक किंवा ज्वलनशील पदार्थ नेल्यास कडक कारवाई
ट्रेनमध्ये फटाके, गॅस सिलेंडर, पेट्रोल, केरोसीन किंवा इतर कोणतेही धोकादायक व ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी आहे.

दंड: नियमांचे उल्लंघन केल्यास ₹10,000 पर्यंत दंड तसेच प्रकरणाच्या स्वरूपानुसार तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

2. महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या पुरुषांवर दंड
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिलांसाठी राखीव डब्यात पुरुषांनी प्रवास केल्यास कारवाई केली जाईल.
दंड: अशा प्रकरणात ₹2,500 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
3. विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर कारवाई
रेल्वे किंवा आयआरसीटीसीच्या वैध परवान्याशिवाय ट्रेनमध्ये किंवा रेल्वे परिसरात कोणत्याही वस्तूंची विक्री करता येणार नाही.
दंड: नियम मोडल्यास ₹2,000 पर्यंत दंड आकारला जाईल.
4. विनातिकीट प्रवाशांवरही कडक कारवाई
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष तपासणी मोहीम आणि डिजिटल पडताळणीद्वारे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, या नियमांचा उद्देश प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ करणे हा आहे. त्यामुळे नियमांचे पालन करूनच प्रवास करावा, अन्यथा आर्थिक दंडासोबत कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.