लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपूर्वी 1,500 रुपये खात्यात जमा होणार; जाणून घ्या


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा प्रलंबित 1,500 हप्ता ऑगस्टमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. काही वृत्तांनुसार 10 ते 15 ऑगस्टदरम्यान हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मात्र, अंतिम तारीख सरकारकडून अधिकृतपणे जाहीर होणे बाकी आहे. या योजनेत e-KYC आणि पात्रतेची पडताळणी करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर 1 कोटी 66 लाख 28 हजार महिला पात्र असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यामुळे आता केवळ पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

e-KYC न केलेल्या महिलांचे काय?

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC महत्त्वाची करण्यात आली होती. निर्धारित मुदतीत e-KYC पूर्ण न केलेल्या तसेच योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या अनेक अर्जदारांना लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे. विविध अहवालांनुसार अशा अर्जांची संख्या सुमारे 80 लाख आहे.

याशिवाय उत्पन्न, सरकारी नोकरी आणि इतर पात्रता निकषांचीही पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला सर्व निकष पूर्ण करतात आणि त्यांची e-KYC प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार?

जुलैचा हप्ता उशिरा मिळाल्यास जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्र ₹3,000 मिळतील, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र, सध्या याबाबत अधिकृत निर्णय झालेला नसल्याने ₹3,000 निश्चित मिळणार, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच याबाबत स्पष्टता येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!