आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून महत्त्वाच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या काय बदलणार


नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. डिजिटल सेवांचा वापर वाढवणे आणि नागरिकांची सुरक्षा अधिक भक्कम करणे या उद्देशाने आधार कार्डशी संबंधित एका महत्त्वाच्या सेवेवरील शुल्क तात्पुरते माफ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आधार कार्डमध्ये ईमेल आयडी नोंदवण्यासाठी किंवा आधीचा ईमेल आयडी बदलण्यासाठी आतापर्यंत नागरिकांना ७५ रुपये शुल्क भरावे लागत होते. मात्र, UIDAI च्या नव्या धोरणानुसार ही सेवा १ जुलै २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, या सुविधेसाठी नागरिकांना आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसणार आहे. UIDAI च्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार आहे. काही मिनिटांत मोबाईलवरूनच नवीन ईमेल आयडी नोंदवता किंवा जुना ईमेल आयडी अपडेट करता येणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

ईमेल आयडी आधारशी जोडणे का महत्त्वाचे?

UIDAI च्या माहितीनुसार, केवळ मोबाईल नंबर लिंक असणे पुरेसे नाही. आधारची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी ईमेल आयडी जोडणेही तितकेच आवश्यक आहे.

भक्कम बॅकअप पर्याय :

मोबाईल नंबर बदलल्यास, हरवल्यास किंवा नेटवर्क उपलब्ध नसल्यास ईमेल आयडी हा सुरक्षित पर्याय ठरतो.

त्वरित अलर्टची सुविधा :

आधार कार्डचा वापर, अपडेट किंवा इतर महत्त्वाच्या हालचालींबाबतची माहिती थेट ईमेलवर प्राप्त होऊ शकते. त्यामुळे संभाव्य फसवणूक लवकर लक्षात येण्यास मदत होते.

सुलभ ई-केवायसी प्रक्रिया :

ईमेल आयडी जोडल्यास डिजीलॉकरसह विविध सरकारी आणि वित्तीय सेवांमध्ये लॉगिन करणे तसेच ई-केवायसी प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होते.

दरम्यान, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी UIDAI कडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!