मोठी बातमी! आधी IPS अंजली कृष्णाच्या चौकशीची मागणी, आता मिटकरींचा युटर्न, दिलगिरी व्यक्त..

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी
महिला अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मागणी केली होती.या मागणीवर त्यांनी आता यूटर्न घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

सोशल मिडीयावर अमोल मिटकरींनी पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, सोलापुर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भुमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भुमिकेशी पूर्णपणे सहमत आहे”, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
दरम्यान याआधी अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) पत्र लिहून कृष्णा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली. एका पत्रात त्यांनी कृष्णा यांची शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली. त्यांनी विनंती केली की हे निष्कर्ष संबंधित सरकारी विभागांना कळवावेत. अधिकृत नोंदींची योग्य छाननी करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता युटर्न घेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
