मोठी बातमी! दहावी -बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती…


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे.

शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक हे www.mahahsscbobard.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आले आहे. परीक्षेआधी माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणार आहे. शाळा आणि कॉलेजमधून देण्यात येणारेच वेळापत्रक अंतिम असणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेचा तपशील :
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला आहे.

दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होईल, अशी माहिती मंडळाने दिली.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक

बारावी : १० फेब्रुवारी ते १८ मार्च

दहावी : २० फेब्रुवारी ते १८ मार्च

दरम्यान छापील वेळापत्रकारवरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी लागणार आहे. संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले ग्राह्य धरण्यात येऊ नये,असे मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!