मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर ED ची कारवाई, 800 कोटींची संपत्ती जप्त..


हैदराबाद : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) हैदराबाद युनिटने मोठी कारवाई केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे . ही एक मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. जगन मोहन रेड्डी यांची 27.5 कोटी रुपयांची शेअर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

तसेच दालमिया सिमेंट्स भारत लिमिटेड (DCBL) ची 377.2 कोटी रुपयांची जमीनही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 793.3 कोटी रुपये आहे. 2013 मध्ये सीबीआयने वाय.एस. जगन मोहन रेड्डी, डीसीबीएल आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर भारतीय कायदे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित नियमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते.

जगन रेड्डी त्याचे जवळचे सहकारी व्ही. विजया साई रेड्डी (जे ऑडिटर आणि माजी खासदार आहेत) आणि DCBL चे पुनित दालमिया यांनी रघुराम सिमेंट लिमिटेडमधील त्यांचे शेअर्स PARFICIM या फ्रेंच कंपनीला विकण्याचा करार केला होता. हा सौदा 135 कोटी रुपयांना झाला होता. यातील 55 कोटी रुपये जगन रेड्डी यांना रोख स्वरूपात देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीत जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवरून आयकर विभागाला या पैशांची माहिती मिळाली. दरम्यान, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर 14 वर्षांनी ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने जुन्या प्रकरणाच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. त्या प्रकरणात डीसीबीएलने भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली होती.

DCBL ला हा जप्तीचा आदेश 15 एप्रिल 2025 रोजी मिळाला होता, तर 31 मार्च रोजीच हा आदेश जारी करण्यात आला होता. जमिनीची प्रारंभिक खरेदी किंमत 377 कोटी रुपये होती. जगन मोहन रेड्डी यांचे कार्मेल एशिया होल्डिंग्स लिमिटेड, सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हर्षा फर्ममधील शेअर्स जप्त करण्यात आले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!