मोठी बातमी! रायगडमध्ये भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, उडाली खळबळ…

पेण : रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रात्री लोक झोपेत असतानाच अचानक रायगड जिल्ह्यात भूकंपाचे हादरले जाणवले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या,काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले.

याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत. रायगड जिल्ह्याला बुधवारी रात्री भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यामुळे लोकांनी रात्र जागून काढली आहे. याबाबत माहिती अशी की, पेण आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
तसेच पेण तालुक्यातील तिलोरे, वरवणे आणि सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. भूकंपाचे हादरले जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. काही वेळातच ही बातमी सगळीकडे पसरली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रायगडमधील पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे हादरले जाणवले. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांची गावांना भेट देत माहिती घेतली. दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदु कोणता होता? याबाबत कोणताही माहिती मिळालेली नाही.

अचानक नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या, काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही. याबाबत माहिती घेतली जात आहे.