मोठी बातमी! पुण्यात चहा पीत असलेल्या 12 जणांना कारने उडवलं, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास अटक…


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सदाशिव पेठत एका चारचाकी गाडीने 12 जणांना उडवल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. याबाबत चालकास अटक करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

भावे हायस्कूलजवळ कारने 12 जणांना उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलीस ठाण्याचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत. टपरीवर चहा पिण्यासाठी विद्यार्थी गेले होते. यावेळी एका कारने सर्वांना धडक दिली. या अपघातात 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे रविवारी एमपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाणार होते.

आता कार चालकाच्या चुकीमुळे त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.  भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या ड्रायव्हरने दारू प्यायल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!