मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्षांवर सामूहीक बलात्काराचा आरोप, हिरोईन बनवण्याचे आमिष दाखवून तरूणीला फसवले…

एक धक्कादायक बातमी भाजपच्या गटातून समोर आली आहे. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्यावर एका तरुणीने गँगरेपचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सिंगर रॉकी मित्तल यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
बडोली आणि मित्तल यांनी कसौलीच्या एका हॉटेलमध्ये तिच्यावर गँगरेप केला असल्याचे तरुणीने सांगितले आहे. या तरुणीच्या तक्रारीवरून कसौली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र हा हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने एक महिन्यानंतर ही माहिती उघड झाली.
सोलन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या म्हणण्यानुसार, ही घटना 7 जुलै 2023 रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बडोली आणि मित्तल यांच्यावर बीएनएसच्या धारा 376 डी आणि 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या पीडित तरुणीने तक्रारीत सांगितले की, 3 जुलै 2023 रोजी ती आपल्या मित्रांसोबत कसौली फिरायला आली होती. ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे तिची हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि सिंगर रॉकी मित्तल यांच्याशी ओळख झाली. यावेळी रॉकी मित्तल यांनी तिला एल्बममध्ये अभिनेत्रीची भूमिका देण्याचे आमिष दाखवले.
त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी तिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकावून हॉटेलच्या खोलीबाहेर काढून टाकले. पीडितेने असा आरोपही केला आहे की, तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून तिला गंभीर परिणाम भोगण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे ती घाबरलेली होती.