मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा धक्का, कोर्टाचा मोठा निर्णय, घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी…


बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. कोर्टात करुण शर्मा यांचा मोठा विजय झाला आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुण शर्मा यांचा दावा होता. याबाबत अनेकदा वाद झालेले समोर आले होते. काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आज त्यांना यश मिळालं आहे.

आता फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलय. यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचे समोर आले आहे. यामुळे आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

कोर्टात करुण शर्मा यांचा मोठा विजय झाला आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्याशी असलेला समोर येत होता, करुणा मुंडे यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला हे अनेकदा सांगितले होते. आता कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हिंसाचाराचे आरोप केले होते. यामुळे याबाबत सुनावणी झाली. आताच धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!