मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या मागणीने भुजबळानां धडकी ; म्हणाले..32% आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्दच..


पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून ओबीसी आक्रमक झाली असून मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढाई लढणार असा निर्धार केला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांनी 32 टक्के आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्द करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे भुजबळानां चांगलीच धडकी भरली आहे.

याबाबत पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा धरून ओबीसी लोकसंख्या 60% आहे. बत्तीस टक्के आरक्षणात तुम्ही वेगळे प्रवर्ग केले, ते सगळे प्रवर्ग रद्द करायला पाहिजेत. ओबीसींसाठी 32 टक्के खुलं आरक्षण पाहिजे. आमच्यातरी नोंदी आहेत, तुमच्या तर नोंदी नाहीत, काहीही नाहीत’ असा टोलाही जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.तसेच तुमचा एक शब्द होता अराजकता माजेल, तेव्हापासून मराठे नेते टाइट झालेले आहे. तुझे शब्द आम्ही राखीव ठेवलेले आहे. तू किती शहाणा आहेस हे आम्हाला माहित आहे. पहिल्यांदा जशा दंगली केल्या तुमचे लोक घालून आणि त्या दंगली तुम्हीच केलेले आहेत असा देखील आरोप जरांगे पाटलांनी भुजबळ यांच्यावर केला आहे.

दरम्यान मराठा समाज आणि ओबीसीवरून चांगलेच राजकीय वादंग उठले आहे. यावरून बोलताना जरांगे पाटलांनी भुजबळांना टोला लगावला. ते म्हणाले, आमचे मराठ्यांचे नेते तुझ्यासारखे नालायक आणि नासके नाहीत, जातीवाद करत नाहीत, तू जातीवाद करतो असा आरोपही जरांगे पाटलांनी त्यांच्यावर केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!