मोठी बातमी! आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी अखेर फरार आरोपी अटकेत, महत्वाची माहिती आली समोर..


पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. मामा सतीश वाघ यांचा खून करून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

आता याबाबत हडपसर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकांना मोठे यश आले आहे. सतीश वाघ करण्यासाठी भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याची बाब तपासात समोर आली होती. गुन्हे शाखेने फरार आरोपी आतिश जाधव यास धाराशिव येथून ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. आरोपींनी सतीश वाघ यांचे कारमधून अपहरण करून चालत्या कारमध्ये धारदार चाकूने गळ्यावर तब्बल ७२ वेळा वार करून त्यांचा खून केला. व्यायामासाठी बाहेर गेल्यानंतर त्यांचे अपहरण केल्याची माहिती मिळताच वाघ यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अक्षय जावळकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तर, पवन शर्मा याने नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या दोघांना सोबत घेऊन सतीश वाघ यांचा खून केला. जावळकर हा पूर्वी वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होता. वैयक्तिक कारणातून दोघांमध्ये वाद होता. याच कारणातून जावळकरने वाघ यांना संपवण्याचं ठरवले.

शर्मा आणि जावळकर पूर्वी एका ठिकाणी कामाला होते. दोघांची चांगली ओळख होती. जावळकर याने शर्माला वाघ यांचा जीव काढण्यासाठी मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी पाच लाखांची सुपारी दिली असल्याची माहिती आहे. तेव्हापासून, शर्मा संधीच्या शोधात होता. मात्र, संधी मिळत नव्हती.

दरम्यान, सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हडपसर परिसरातील मांजरी भागात राहत होते, त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय देखील आहे. मात्र त्यांचा खून केल्याने मोठी खळबळ उडाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!