पीएम किसान योजनेबाबत मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता वेळेआधीच जमा, कोणाला मिळाला लाभ? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण २० हप्ते मिळाले आहेत आणि शेतकरी बांधव पुढील हप्त्याची आतुरतेने वाट सुद्धा पाहत आहेत.

तसेच अशातच आता या योजनेच्या हप्त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरंतर मीडिया रिपोर्ट मध्ये ऑक्टोबर महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा २१ वा हप्ता जमा करण्यात येईल असा दावा केला जात होता.
दिवाळीच्या आधी पीएम किसान चा लाभ मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चा सुरू असतानाच पी एम किसान च्या काही लाभार्थ्यांना याचा २१ वा हप्ता मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील तीन राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचा २१ वा हफ्ता जारी करण्यात आला आहे. या निर्णयाचा संबंधित राज्यातील २७ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पण या राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी सरकारने वेळेआधीच पीएम किसानचा हप्ता का जारी केला ? याबाबत आता आपण माहिती आपण जाणून घ्या…

उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये भीषण परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आणि हेच कारण आहे की या संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ लवकर देण्याचा निर्णय केंद्रातील सरकारकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या अनुषंगाने पीएम किसानचा २१ वा हप्ता या संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना वेळेआधीच मिळाला आहे. या राज्यातील २७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५४० कोटी रुपये वर्ग करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
या राज्यांमध्ये जशी परिस्थिती तयार झाली होती तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त भीषण परिस्थिती आपल्या राज्यातही तयार झालेली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तात्काळ मदतीची गरज आहे.