मोठी बातमी! पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आता अनोखी बस ; सीएनजी डिझेलवर नाहीतर’ या’ इंधनावर धावणार…


पुणे : पुण्यात वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेता आता शहरात अनोखी बस धावणार आहे.दिल्ली आणि बडोदा येथे आधीच हायड्रोजन बस सुरू आहे. दरम्यान आता ही बस आपल्या पुण्यातही धावताना दिसणार असून यामुळे प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येणार आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान अंतर्गत हायड्रोजन इंधनांवर चालणाऱ्या बसची पुण्यात बुधवारी चाचणी घेण्यात आली.त्यानंतर मग ही बस प्रत्यक्षात पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात सुरू केल्या जाणाऱ्या हायड्रोजन बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईल यांच्या समन्वयाने सुरू करण्यात आली आहे.ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच पुण्यात ही बस धावणार की नाही हे क्लिअर होणार आहे. ही बस आधीच दोन शहरांमध्ये सुरू आहे म्हणून पुण्यातही याला हिरवा कंदील मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान हायड्रोजन बस पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली तर यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार असून या निर्णयाचा शहरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

शहरात ज्या हायड्रोजन बसची ट्रायल सुरू आहे त्यामध्ये एकूण 35 प्रवासी बसून प्रवास करू शकतील. तसेच यामध्ये दहा प्रवाशांना उभे राहण्याची जागा राहणार आहे.एक किलो हायड्रोजनमध्ये बस 11 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सात दिवस सुरू असणारी ही चाचणी यशस्वी झाली तर पीएमपीच्या ताफ्यात आपल्याला हायड्रोजनच्या बसेस दिसणार आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!