तापमानात मोठी घसरण, उन्हाळ्यात गारठा, यावर्षी उन्हाळा तीव्र असणार, हवामान खात्याचा अंदाज…

पुणे : राज्यभरात सर्वत्र उन्हाच्या झळा बसत असताना आता नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा गारवा काल जाणवायला सुरुवात झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिक जिल्ह्यात असलेल्या निफाडमध्ये तापमान कमी झाले. यामुळे हवेत गारव्याची लाट आल्याचे दिसून आले आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यात चांगलेच ऊन जाणवले.
यामुळे येणाऱ्या काळात यावर्षी उन्हाळा तीव्र असणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु वातावरणातील विचित्र बदलाचा अनुभव नाशिककरांना आला. निफाडमध्ये पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. निफाडचे कमाल तापमान ३१.३ तर किमान तापमान ४.२ अंशावर वर पोहचले आहे.
कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून थंड हवा येत आहे. वातावरणात अचानक बदल झाला आहे. राज्यभरात तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहे. याठिकाणी एका दिवसात ७ अंशांनी तापमान घसरले.
निफाडमध्ये शीतलहरी वाहू लागला. काल पहाटे थंडीचा निफाडमध्ये थंडीचा कडाका जाणवला. नाशिक जिल्ह्याचे तापमान घसरले. नाशिक शहरात १० अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये ४.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.
यामुळे येणाऱ्या काळात असेच बदल दिसणार आहेत. जम्मू काश्मीर भागात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणा-या शीतलहरींमुळे जळगावसह जिल्ह्याच्या वातावरणात बदल झाला आहे. तसेच यावर्षी तीव्र उन्हाळा देखील बघायला मिळणार आहे.