राज्य सरकारचा मोठा निर्णय! कंत्राटी ग्रामसेवक मानधनात वाढ, शेतकऱ्यांना मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती..


मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारने कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटीची मान्यता देण्यात आला आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता देण्यात आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी, अशी अनेकदा मागणी झालेली होती. मात्र सरकारने थेट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात आला आहे.

तसेच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली.
लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार, पुणे येथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली, चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार, अशा प्रकारे निर्णय घेण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!