रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नियम बदलणार, जाणून घ्या…


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बनावट बुकिंग रोखण्यासाठी तिकीट बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नव्या नियमांनुसार, कोणत्याही ट्रेनसाठी बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त आधार-प्रमाणित IRCTC खातेदारांनाच सामान्य आरक्षण तिकीट बुक करता येणार आहे.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला १५ नोव्हेंबरसाठी जनशताब्दी एक्सप्रेसचे तिकीट हवे असेल आणि त्याचे बुकिंग १६ सप्टेंबर रोजी रात्री १२:२० वाजता सुरू होत असेल, तर १२:२० ते १२:३५ या वेळेत फक्त आधार-लिंक असलेल्या IRCTC खात्यांद्वारेच तिकिट बुकिंग शक्य होईल. ज्यांचे खाते आधारशी जोडलेले नाही, त्यांना या काळात तिकीट बुक करता येणार नाही.

याशिवाय, आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत अधिकृत एजंटना तिकिटे बुक करण्याची परवानगी मिळणार नाही.

बनावट व गैरव्यवहारांना आळा घालणे.

खऱ्या प्रवाशांना सहजपणे तिकीट उपलब्ध करून देणे.

सणासुदीचा काळ, जसे की दसरा, दिवाळी, नवरात्र, छठ पूजा आणि लग्नसराईच्या काळात तिकीटांची मागणी प्रचंड असते. बुकिंग सुरू होताच काही सेकंदांत तिकिटे संपतात. नव्या नियमामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि प्रवाशांना योग्य संधी मिळेल, असा रेल्वेला विश्वास आहे.

IRCTC खाते त्वरित आधारशी जोडा, अन्यथा १ ऑक्टोबरनंतर सुरुवातीच्या १५ मिनिटांत तिकिट बुकिंग करता येणार नाही.

सामान्य आरक्षणाचे बुकिंग दररोज रात्री १२:२० ते ११:४५ या वेळेत खुले असते.

नवीन नियम फक्त बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या १५ मिनिटांसाठीच लागू असेल.

खऱ्या प्रवाशांना तिकिट मिळण्याची संधी वाढेल

बनावट बुकिंग कमी होईल

तिकिट बुकिंग प्रक्रिया पारदर्शक बनेल

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!