ठाकरेंना मुबंईत मोठा धक्का; थेट महापालिकेत निवडून आलेली महिला नगरसेवक शिंदेंच्या गळाला

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौरपदाची चुरस चांगलीच वाढली आहे.अशातच आता ठाकरेंच्या नगरसेवकांना फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा असतानाच ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. आजच्या सेना भवनातील बैठकीला डॉ सरिता म्हस्के गैरहजर होत्या.तसेच गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले त्यावेळीही सरिता म्हस्के गैरहजर होत्या. मात्र मुंबईतील शिंदेंच्या नगरसेवकांच्या गट स्थापनेसाठी सरिता म्हस्के कोकण भवनाकडे रवाना झाल्या.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या 65 नगरसेवकांपैकी एक नगरसेविकेने बंडखोरी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आल्यानंतरही ही नगरसेविका गट स्थापनेसाठी आज नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये ठाकरेंच्या उर्वरित 64 नगरसेवकांसोबत गेली नव्हती. मात्र आता त्या शिंदेंच्या नगरसेवकांच्या नोदींच्या वेळी कोकण भवनाकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

डॉ. सरिता म्हस्के निवडणुकीत प्रभाग क्रमांक 157 (एल वॉर्ड, चांदिवली-संघर्ष नगर परिसर) मधून निवडून आल्या आहेत. त्या सुरुवातीला एकनाथ शिंदे गटात होत्या, पण डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी आणि त्यांचे पती डॉ. रवींद्र म्हस्के यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी निवडणूक जिंकली. आता ते शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.