मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली एकनाथ शिंदेंची साथ..

मुंबई : शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपत प्रवेश करणार आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या दोन दिवसांत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
याबाबत शिवाजी सावंत यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या घरी सुखी राहा असा उपरोधिक टोला लगावला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहेकी, शिवाजी सावंत आणि त्यांच्यासह भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा हा वैयक्तीत निर्णय आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे. अनेक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. यामुळे येणाऱ्या काळात अजून अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.