एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; नवी मुंबईत मतदानादिवशीच शिंदेंच्या दोन उमेदवारांना अटक ; काय आहे प्रकरण?


मुंबई:राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच मतदानाच्या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईत शिवसेनेच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार एम. के. मढवी आणि त्यांचे सुपुत्र करण मढवी यांना ऐरोली मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी रबाळे पोलीसांनी अटक केली आहे. ऐरोली सेक्टर 16 मधील मंडळाच्या पोरांना मढवी कुटुंबियांनी मारहाण केली होती. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार एम के मढवी, उमेदवार विनया मढवी आणि मुलगा करण मढवी वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

एम. के. मढवी, करण मढवी व विनया मढवी हे तिघेही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असून सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एम. के. मढवी प्रभाग क्रमांक 4 -ड, करण मढवी प्रभाग क्रमांक 5 तर, विनया मढवी प्रभाग क्रमांक 5-ड मधून निवडणुक लढत आहेत. आज मतदानाच्या दोघांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!