मोठी बातमी! सरकारचा निर्णय मान्य, पण…; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

जालना : मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपली भूमिका नव्याने मांडली. राज्य सरकारने बुधवारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर महत्त्वाची घोषणा केली होती.
आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढले. पण या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत आली नाही. काही माध्यमांकडून काही महत्वाचे मुद्दे कळाले आहे. मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पण सर्व सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. तसेच सरसगट प्रमाणपत्र देण्यासाठी एक महिन्याची वेळ सरकारने मागितली आहे.
तर, आमच्याकडे कुणाकडेच कुणबी असल्याची नोंदी नाहीत. त्यामुळे कालच्या निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किमान निर्णय घेण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे किमान मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण वंशावळीचे दस्ताऐवज नसल्याने आम्हाला निर्णयाचा फायदा होणार नाही.
आम्हाला सरकारची अडवणूक करायची नाही. आमची अडचण समजून घ्या. आमची अडवणूक प्रशासनच करत आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की, निर्णयात थोडी सुधारणा करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केले. आता यावर राज्य सरकारच्यावतीने काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आम्ही शांतपणे आंदोलन करत आहे. आमचे सहकारी आजही रुग्णालयात उपचार घेत आहे. तरीही आम्ही शांतपणे उपोषण करत आहे. त्यामुळे वंशवंळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घेऊन, सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच, आमच्याकडे पुरावे असल्याचं आम्ही आधीच सांगितले आहेत.
त्यामुळे सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आदेश काढण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, घेऊन जावेत, असं मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत निजामकालीन पुरावे वाचून दाखवले आहेत. त्यात मराठा जाती समूहाची कुणबी म्हणून नोंद असल्याचा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.
दरम्यान, सरकारने येथे यावे आणि त्यांनी यावे अशी आमची देखील इच्छा आहे.कारण यावर तोडगा निघावे अशी त्यांची आणि आमची देखील इच्छा आहे. त्यामुळे सरकरच्या शिष्टमंडळाने यावे चर्चा करावी आम्ही त्यांना पुरावे देण्यासाठी तयार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तसेच हे आंदोलन असेच सुरू असणार असल्याचं देखील ते म्हणाले.