मोठी दुर्घटना! मुंबईहुन अमृतसरकडे निघालेल्या धावत्या एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले अन…

पुणे : राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असताना दुसरीकडे मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेससोबत धकादायक घटना घडली आहे पालघरजवळ रेल्वे मार्गावर अमृतसर एक्स्प्रेसचे डबे वेगळे झाल्याची घटना घडली आहे. अचनाक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्स्प्रेससोबत ही घटना घडली. डहाणू स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर अमृतसर एक्स्प्रेसचे दोन डबे अचानक वेगळे झाले. अचानक गाडीचा वेग कमी झाल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बाहेर येऊन पाहिले असताना एक्स्प्रेसचे दोन डबे वेगळे झाल्याचं निदर्शनास आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झालेले नाही.अमृतसर एक्स्प्रेसच्या लोको पायलटने तातडीने रेल्वे थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
दरम्यान, घटनेची माहिती तातडीने रेल्वे विभागाला देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमृतसर एक्स्प्रेसचे वेगळे का झाले, याची पाहणी करत आहे.
