झेलममध्ये मोठी दुर्घटना, विद्यार्थ्यांची बोट बुडून १० विद्यार्थ्यांसह अनेकजण बेपत्ता…


श्रीनगर : बटवार येथील झेलममध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली. या बोटीमध्ये १० ते १२ शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण प्रवास करत होते. चार दगावल्याची माहिती असून अनेक जण बेपत्ता आहेत. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये झेलम नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली.

दरम्यान, अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला जाणारी एक बोट आज पहाटे मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बटवारा भागाजवळ झेलम नदीत उलटली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!