संजय राऊत येणार पाटसला! भिमा पाटस कारखान्याचा पर्दाफाश करणार…!
पुणे : खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणीही देखील केली आहे.या प्रकरणामुळे भाजप आणि आमदार राहुल कुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यातच ,आता खासदार संजय राऊत यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत पुढील पंधरा दिवसात भीमा पाटस संदर्भात पाटसला सभा होणार असल्याचे सांगितले तसेच या सभेला ते उपस्तिथ राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. साडेपाचशे कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. असेही राऊत म्हणाले. भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी कारखान्यात झालेल्या कथित साडेपाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराबाबात काल-परवा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे.
आमच्यावर नसलेल्या गोष्टी उभ्या करून सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करून कारवाई केली जाते, तशी कारवाई ते स्वतःच्या पक्षातील भ्रष्ट कारभाराची का करत नाहीत? असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित करत भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांची प्रचंड लूट व फसवणूक झाली आहे. यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांनी व सभासदांनी मला पुराव्यासहित दिली आहे असे सांगितले.
यासंदर्भात सीबीआय व ईडीलाही पत्राद्वारे कळणार आहे. ज्या पद्धतीने सीबीआय व ईडी आमच्या मागे लागते, चौकशी करते तर मग एवढी मोठी शेतकऱ्यांची फसवणूक झाली याचीही चौकशी व्हायला हवी.
कारखान्यात भ्रष्टाचार झाला नाही असे आमदार कुल व त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे ना? तर मग चौकशी होऊ द्या. चौकशीला का घाबरताय? शेतकरी व सभासदांनी मला या सभेसाठी बोलवले आहे आणि मी आवर्जून जाणार आहे आणि शेतकऱ्यांनी व सभासदांना मी कारखान्यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला या संदर्भात मार्गदर्शनही करणार असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेतून ११ आमदार व ९ खासदार फुटुन त्यांच्या पक्षात गेले आहेत. त्यांची सीबीआय व ईडीची खटले थांबवले , भाजप सरकार हे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. असा आरोपही राऊत यांनी केला यावेळी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, कर्जतचे आमदार रोहित पवार उपस्थित होते.