Bhigwan News : भिगवणच्या भुरट्या पत्रकारांची कमालच! घटना बलात्काराची.. अन् खंडणी पन्नास लाखांची, एका महिला पत्रकारासह दोन जणांवर गुन्हा….


Bhigwan News : भिगवणमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाखल बलात्काराच्या प्रकरणात मिटवामिटवी करण्यासाठी यूट्यूब चैनलच्या पत्रकारांनी सहा लाख रुपये घेतले, शिवाय प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाखांची आणखी खंडणी मागितली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी दोन खंडणीखोर पत्रकारांवर भिगवण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, भिगवण पोलीस ठाण्यात एका पिडीतेने दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या दोघांनी सन २०१९ ते २०२३ यादरम्यान पिडीतेच्या असहायतेचा गैरफायदा घेत ओळख वाढवून वेळोवेळी विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व या प्रसंगाचे व्हिडिओ काढले अशा स्वरूपाची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने संबंधित दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला.

यातील एक आरोपी पत्रकाराचा मुलगा आहे. सदरचा पत्रकार श्रीमंत असल्याने आपण त्याच्याकडून त्याची बदनामी होऊ नये, म्हणून अधिकाधिक रक्कम काढू शकतो असा जावईशोध स्थानिक युट्युबच्या दोन पत्रकारांनी लावला, विशेष म्हणजे यात एक महिला पत्रकार सहभागी झाली.

तसेच सुरुवातीला हे प्रकरण दोन लाखावर होते, दोन लाख रुपये मिळाल्यानंतर आणखी दोन लाख रुपये मागणी केली. ते देखील मिळाले, मग आरोपींची अब्रू अधिक किमती आहे हे लक्षात घेत या महिला पत्रकाराने आरोपीच्या नातेवाईक पत्रकाराकडे आणखी दोन लाखाची खंडणी मागितली. ती देखील मिळाली.

एकूण ६ लाख रुपये मिळाल्यानंतर या दोन्ही पत्रकारांच्या तोंडाला पाणी सुटले आणि संबंधित बलात्काराचे प्रकरण मिटवण्यासाठी आता पिडिताही ऐकत नाही आणि पत्रकारही ऐकत नाही असे सांगत ५० लाख रुपयांची मागणी केली.

दरम्यान यानंतर मात्र संबंधितांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि एका महिला पत्रकारासह दोन पत्रकारावर सहा लाख रुपये घेतले व ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!