नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाग्यश्री पाटील यांची निवड…


शहाजीनगर : इंदापूर येथील येथील निरा -भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाग्यश्री पाटील यांची निवड करण्यात आली. कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली होती. यामुळे कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.

कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या पंचवीस वर्षात सलग पाच निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आज भाग्यश्री पाटील यांची एकमताने चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन १९९९ मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.

कारखाना कार्यक्षेत्रातील सेचाळीस गावांमधील सभासदांनी व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!