कॉलेज परिसरातील कॅफेत पडद्याआड तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, आमदारांना समजलं, पोलिसांना सोबत घेतलं अन्…


धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्तमंदिर येथे नामांकित कॉलेज परिसरातील अनेक कॅफेवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तरुणाईमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा आहे.

कॉलेज परिसरात अशाप्रकारे विद्यार्थी-विद्यार्थींना खुलेआम अश्लील चाळे करण्यासाठी पडदे लाऊन सोय करुन देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत असून पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये अवैध कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई केली. आमदारांसह आयुक्त व पोलीस अधिक्षकही या कारवाईत सहभागी झाले होते. धुळे शहरातील देवपूर भागात दत्तमंदिर येथे नामांकित कॉलेज आहे. याच कॉलेजच्या परिसरातील अनेक कॅफे थाटण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे हे सर्व कॅफे अनधिकृत आहेत. या कॅफेमध्ये कॉलेजचे तरुण आणि तरुणी जात असतात. या कॅफेत या तरुण तरुणींना निवांत पणा मिळावा म्हणून कॅबिन करण्यात आले आहे. शिवाय त्याला पडदेही लावण्यात आले आहे.

दरम्यान, देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेजची मुले-मुली अश्लील चाळे करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!