Bazar Samiti : हवेली (पुणे) बाजार समितीच्या कारभाऱ्यांवर शेतकरी व व्यापाऱ्यांचा तक्रारींचा पाऊस! फुलबाजार वाढीव खर्च, कार्यालयवरील खर्चांपेक्षा समस्या सोडवा..!!


Bazar Samiti मार्केट यार्ड : रंगरंगोटी, कार्यालय नूतनीकरण, बांधकामांचा वाढीव खर्च, यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा शेतकरी बाजार घटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, असा सूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटला.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाने बुधवारी घेतलेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समितीच्या खर्चावर बोट ठेवण्यात आले. (Bazar Samiti)

सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रवीण शिंदे, प्रदीप कंद, संचालक गणेश घुले, प्रकाश जगताप, सुदर्शन चौधरी, नितीन दांगट, नानासाहेब आबनावे, शशिकांत गायकवाड, मनीषा हरपळे, सारिका हरगुडे, अनिरुद्ध (बापू) भोसले, संतोष नांगरे, शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार यांच्यासह कामगार, तोलणार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..

आतापर्यंत झालेला खर्च आणि प्रस्तावित खर्चाचे अंदाजपत्रक सचिवांनी वाचून दाखविले. फुलबाजार बांधणीसाठी सुरुवातीच्या काळात अंदाजे ५४ कोटींचा खर्चहोणार होता.

परंतु कामाची संथ गती आणि त्यातील बदलामुळे हा खर्च १२० कोटींवर जाऊन पोहोचला. तसेच केळी बाजार रंगरंगोटी, मुख्य कार्यालय नूतनीकरणासाठी कोट्यवधी खर्च आणि मांजरी उपबाजारातील पिण्याच्या पाण्याचा अभाव, मार्केट यार्डातील स्वच्छतागृहाची दुरुवस्था अशा विविध समस्या शेतकरी, मतदार, व्यापाऱ्यांनी मांडल्या.

व्यापारी घटकांनी नव्या फुलबाजारात प्रतीक्षा यादीत काळेबेरे असल्याची शंका उपस्थित करत यात लक्ष घालण्याची मागणी केली. याबरोबरच विविध नवीन योजना आणण्याचीदेखील मागणी केली.

फिश मार्केट करण्याची शेतकऱ्यांची मागणी…

मार्केट यार्डात होणाऱ्या फिश मार्केटला विरोध झाल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली होती. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेततळी झालेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मासळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बाजार समितीने फिश मार्केट करावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत शेतकरी आणि काही शेतकरी प्रतिनिधींनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!