बावनकुळेंनी वाकड्यात शिरून फालतू बोलू नये, नाहीतर…!! जरांगे पाटलांनी दिला थेट इशारा


जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आता नवीन सरकार विरोधात मनोज जरांगे यांनी लढाई छेडली आहे. अंतरवाली सराटीत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

त्यातच आता त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फालतू न बोलण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी मागच्यावेळी आंदोलन, मोर्चे, बैठका, मेळावे, सभा यांमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

यावेळी त्यांच्या टार्गेटवर फडणवीसानंतर आता दुसरा भाजपचा बडा नेता असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जरांगे म्हणाले, समाधान न व्हायला तुम्ही काय केले, फालतू बोलायचं नाही, आम्ही तुम्हाला सन्मानाने बोलतो, वाकड्यात शिरायचं नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच तसा शहाणपणा इकडे नाही शिकवायचा, माजुरड्यासारखे बोलायचे नाही, अशा शब्दांत जरांगेंनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहेत. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच तोफ डागली.

जरांगेंनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच फटकारले आहे. मराठा समाजाच्या भावना सरकार समजून घ्यायला तयार नाही, तुमचा राजकीय विरोध असेल किंवा मतभेद असतील,पण गरीबांशी सूड भावनेने का वागत आहे, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!