आता लढाई माळेगावची!! छत्रपती जिंकल्यानंतर उद्या अजित पवारांचा बारामतीत मेळावा, तावरेंसोबत युती होणार?


बारामती : नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आता उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वपक्षीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे छत्रपतीसारखा प्रयोग अजित पवार माळेगावमध्ये करणार का? अशी चर्चा सुरू आहे.

गुरूवारी सकाळी दहा वाजता कसबा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कोणती भूमिका जाहीर करतात? याकडे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचेही लक्ष लागून राहिले आहे. छत्रपतीमध्ये पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत युती करून त्यांनी कारखाना जिंकला.

ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या गोटात सध्या शांतता आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून पूर्ण ताकदीने तयारी सुरू असल्याची चर्चा त्यांचे समर्थक करत आहेत. छत्रपतीचा मोठा विजय ही जमेची असल्याचे गणित गृहीत धरून माळेगावची निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील पंचवार्षिक निवडणुकीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे व माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या ताब्यातून हिसकावली. त्यांचे काही संचालक निवडून आले आहेत.

आता पुन्हा एकदा त्यांच्याशी सामना होणार का? आणि अटीतटीचा सामना होणार का? हे लवकरच समजेल. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. यामुळे अजित पवार नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!