Baramati News : मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक, आता अजित पवार यांच्या सभेत घातला गोंधळ, नेमकं काय घडलं..?


Baramati News बारामती : मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याच्या विरोधात अजित पवारांच्या जाहीर सभेत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. Baramati News

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमास सभेच्या स्थळी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. Baramati News

पोलिसांनी या कार्यकर्त्याना सभेच्या ठिकाणाहून समजूत बाहेर काढले आहे. त्यानंतर अजित पवारांसह राज्यात सत्तेत असणाऱ्या नेत्यांना बारामतीच नव्हे तर राज्य बंद करण्यात यावा, अशी अग्रही भूमिका युवकांनी मांडली आहे.

रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी पवार यांचा नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता. या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घालून तुमची भूमिका काय? असा सवाल उपस्थित केला होता.

सोमवारी माढा तालुक्यातील पिंपळणेर याठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते.

दरम्यान, स्वतःच्या बारामतीत असा प्रकार कधी घडेल, अशी अपेक्षा अजित पवारांना नसावी. मराठा समाज आरक्षणासाठी अग्रेसिव्ह झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर कोणतेही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!