बळीराजा पुन्हा अडचणीत! महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता..!!

मुंबई : राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पावसाळा पोषक हवामान निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. तसेच उत्तर भारतात थंडीची लाट असून, थंड वारे वाहण्याबरोबरच पावसाचे वातावरण तयार झालेले दिसत आहे.
देशात एकीकडे थंडीची तीव्र लाट आणि दुसरीकडे पावसाची शक्यता असते विचित्र वातावरण सध्या असून राजस्थानातील सिकार या भागात कालपर्यंत सर्वात नीचांकी म्हणजे ४.५ अंश किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.


Views:
[jp_post_view]
