महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ अजूनच वाढला, आता ICMR चे पथक तपास करणार, जाणून घ्या…


मुंबई : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात सध्या एका वेगळ्याच व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसामुळे नागरिकांना अचानक टक्कल पडण्याची समस्या उद्भवली आहे. केवळ तीन दिवसांत लोकांच्या डोक्याचे केस गळून टक्कल पडत आहे.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तज्ञ आढावा घेत आहेत. या प्रकरणात आता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल सायन्सेस (ICMR) चे चेन्नई आणि दिल्ली येथील पथक बुलढाण्यात दाखल होणार आहे. ICMR चे पथक आज दुपारी बुलढाण्यात पोहोचेल.

तसेच इथल्या पाण्याचे नमुने घेऊन, लोकांच्या केसगळतीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करेल. या तपासामुळे टक्कल व्हायरसच्या प्रकोपाचे कारण समोर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, सुरुवातीला डोक्याला खाज सुटण्याची आणि नंतर केस गळत आहेत. नंतर तिसऱ्या दिवशी मात्र पूर्णपणे टक्कल पडण्याची घटना घडते.

अनेक कुटुंबांतील सदस्य एकाच वेळी या समस्येचा बळी ठरतआहेत. यामुळे यावर उपाय शोधला जात आहे. या अज्ञात व्हायरसचे संक्रमण लवकरच एक मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. शांपू किंवा अन्य केमिकल्समुळे होऊ शकते, पण ज्या लोकांनी कधीच शांपू वापरला नाही.

त्यांचेही केस गळत आहेत. यामुळे अज्ञात व्हायरस असल्याचे तज्ज्ञ मानत आहेत. शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, उपचार शिबिरे लावण्याची मागणी केली आहे. यामुळे मात्र भीती निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!