Badlapur : बदलापूर अत्याचाराची घटना कशी उघड झाली? मुलगी म्हणाली आई मला ‘शू’च्या जागी…; ऐकून सगळेच हादरले


Badlapur : बदलापूर येथील एका मोठ्या शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा देश हादरले आहे. या घटनेनंतर पालक संतप्त आझाले असून त्यांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.

तसेच संतप्त पालकांनी व आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर उभे राहून घोषणा देऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे या मार्गावरची सेवा ठप्प झाली आहे.

घटना अशी आली समोर…

ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा अत्याचार झालेल्या एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तर, आपल्या अवघ्या साडेवर्षांच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे. Badlapur

याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगण्यात आलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते.

आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत.

आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं.

हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!