बिबट्याच्या हल्ल्यात बाळाचा मृत्यू, आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नाने कुटूंबाला २५ लाखांची मदत…

दौंड : तालुक्यातील बोरीपार्धी येथील एका शेतामध्ये ऊसतोडणी करीत असताना मजूर विष्णू करण मोरे यांच्या ३ महिने वय असलेल्या लहान बाळाचा बिबट वन्यप्राणी हल्ल्यात दिनांक १७ नोव्हेंबरला मृत्यू झाला होता. यामुळे मदतीचा मागणी केली जात होती.
असे असताना सदर कुटुंबातील सदस्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने एकूण २५ लाख रुपयांची मदत शासनाने वन विभागामार्फत जाहीर केली होती.
मुलाच्या आई – वडिलांना आमदार कुल यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राहुल काळे, वनपाल श्री. अंकुश खरात, वनरक्षक श्रीमती शितल मेरगळ उपस्थित होते.
दरम्यान, या मदतीमुळे कुटूंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार राहुल कुल यांनी या मदतीसाठी विशेष प्रयत्न केले.