औरंगजेब चोर होता, त्याची कबर उखडून फेका, तो देश लुटायचा!! उदयनराजेंची थेट मागणी…


सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, औरंगजेबाची कबर ठेवून काय उपयोग आहे. तो देश लुटायला आला होता. तो चोरच होता. त्याचं उदात्तीकरण का करायचं? असा सवाल उदयनराजेंनी विचारला. यामुळे वातावरण तापले आहे.

तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर दर्शनाला जाणाऱ्यांवर देखील निशाणा साधला. जे लोक औरंगजेबाच्या दर्शनाला जातात. ते का जातात? ते औरंगजेबाचे वंशज आहेत का? औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर त्याला तुमच्या घरी ठेवा. नाहीतर जिथून औरंगजेब आला होता, तिकडे तुम्हीही जावा, देश सोडून जावा, इथं कशाला थांबता, असेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबद्दल गौरवोद्द्गार काढले. औरंगजेब हा उत्तम शासक होता, असं त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त वक्तव्यामुळे अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले होते. नंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी अबू आझमींना औरंगजेबाच्या कबरी जवळ झोपवायला हवं, असं वक्तव्य केलं.

यानंतर राज्यात औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागणीमुळे येणाऱ्या काळात याबाबत तेढ निर्माणहोऊ शकतो. याबाबत आता शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. असे असताना याकाळात अनेक वाद छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य करून केला जात आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!