केडगाव येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हातपाय बांधून रेल्वेखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न…!

दौंड : केडगाव (ता.दौंड) येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 अल्पवयीन वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला रेल्वे गाडीखाली टाकून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणासंबंधीत , प्रकाश शिवाजी शेळके (वय 43, धंदा नोकरी, रा.केडगाव स्टेशन, शिंदे हॉस्पिटल ता.दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याआधारे यवत पोलिसांनी बाळासाहेब उर्फ महेंद्र सोडणवर (रा.केडगाव,पिसेवस्ती ता.दौंड, पुणे) आणि बाळासाहेब भागुजी रुपणवर (रा.दापोडी, ता.दौंड) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी यांचा मुलगा याचे आरोपी बाळासाहेब सोडणवर व बाळासाहेब रुपणवर या दोघांनी एका विशिष्ट कारणावरून मुलास मारहाण केली. त्यानंतर त्याचे स्कॉर्पिओ एम. एच. 42 – ए.डी. 8055 यामध्ये बसवून त्याचे अपहरण केले. तसेच त्याचे हातपाय बांधून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने रेल्वे गाडीखाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.