पिंपरी सांडस येथील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, अष्टापुर येथील सुमित कोतवालसह तिघांवर गुन्हा दाखल, ‘कसा’ उघड झाला गुन्हा?


लोणीकंद : पिंपरी सांडस येथील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकाविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. अष्टापुर येथील सुमित कोतवालसह तिघांवर लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ एकर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याप्रकरणी विशाल गौतम बोरा ( रा. बोरा हाऊस, बाणेर, पुणे) यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे हवेली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बोरा यांनी 2003 साली पिंपरी सांडस येथील गट नंबर 405 मधील 25 एकर 16 गुंठे मिळकत खरेदीखताने घेतलेली आहे. त्यांनी या गटातील एकुण 14 एकर जमिनीची विक्री केली आहे.

त्यानंतर आजपर्यंत बोरा यांनी सचिन नंदकुमार गोते अथवा इतर कोणाशीही गट नंबर 405 मधील उर्वरित मिळकती संदर्भात कोणतीही इसार पावती केलेली नाही. पिंपरी सांडस येथील गट नंबर 405 मधील विशाल बोरा यांच्या नावे असलेली 1 हेक्टर 20 आर व 17 आर पोट खराबा व त्यांचे वडील कै. गौतम बोरा यांच्या नावे असलेली 64 आर अशी एकूण 2 हेक्टर 1 आर मिळकत सुमित कोतवाल, अमोल गोते, अक्षय यादव यांच्यासोबत इसार पावती केली आहे.

सदर मिळकती संदर्भात इतर कोणीही व्यवहार करू नये. तसे केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशा आशयाची जाहीर नोटीस प्रभात न्युज पेपरमध्ये 5 एप्रिल 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. अशी माहिती आहे. याबाबत सुमित प्रल्हाद कोतवाल (रा. आष्टापुर, ता. हवेली, जि. पुणे), अमोल नंदकुमार गोते (रा. शिरवसडी, ता. हवेली, जि. पुणे) व अक्षय दत्तात्रय यादव (रा. यादववस्ती, शिंदेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

दर्म्य, बोरा यांनी सदर मिळकतीबाबत यापुर्वी कोणतीही लेखी स्वरुपात इसार पावती केलेली नाही. तरी आरोपींनी कोणताही ताबा नसताना व कोणताही दस्तऐवज नसताना, त्या मिळकतीच्या अष्टापुर फाटा – राहु रोडवर दोन होल्डींग लावल्या. तसेच बोरा यांची मिळकत त्यांच्या ताब्यात असलेबाबत खोटी जाहिरात लावली आहे.

बोरा यांनी अमोल गोते यांच्याकडे नमुद मिळकतीची इसार पावती व त्यागील सही व अंगठा पाहिला, तेव्हा सदरची सही व अंगठा हा खोटा असल्याची त्यांना समजले. त्यांनी विसार पावतीमध्ये नमूद केलेली रक्कम 35 लाख रुपये कोणत्याही प्रकारे स्वीकारली नाही. सविता प्रदिपकुमार रोकडे यांच्याकडून नोटरी करण्यात आली आहे.

असे असताना बोरा हे त्यांन ओळखत नाहीत. इसार पावती झालेल्या दिवशी बोरा हे कुटुंबासह बाहेर राहण्यास होते. त्यामुळे पिंपरी सांडस येथील गट नंबर 405 २ हेक्टर १ गुंठा जमीन आरोपींनी बळकाविण्याच्या इराद्याने बनावट इसार पावती तयार केली. यामुळे फसवणुक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!