विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे अडचणीत! गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन येणार अंगलट?

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंना गुंडाशी जवळीक राखणे चांगलेच भोवले. त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर अजित पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना तंबी देत फोटो, व्हीडीओ काढताना काळजी घ्या असे म्हटलं होतं. असे असताना मात्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेही अशाच एका गुन्हेगारामुळे चर्चेत आले आहेत.
निमित्त बनसोडेंच्या वाढदिवसाचे होते. गुंड आकाश ऊर्फ आक्या बॉण्ड ऊर्फ सुमित मोहोळ थेट बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आक्या बॉण्डला बनसोडेंनी स्वत:च्या बर्थडेनिमित्त केक भरवला.
हे पाहून बनसोडे गुन्हेगारांना पाठबळ देत नाहीत ना? अशी चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. गुंड आकाश ऊर्फ आक्या बॉण्ड ऊर्फ सुमित मोहोळ अण्णा बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बनसोडे पुत्र सिध्दार्थच्या पेजवर सुद्धा ही रील होती, नंतर मात्र ही रील डिलीट करण्यात आल्याचं ही बोलले जात आहे. यामुळे ती सगळीकडे व्हायरल झाली. आक्या बॉण्डने अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे. त्याच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत अण्णा बनसोडे म्हणाले की, मी आक्या बॉण्डला कधी भेटलो नाही, त्यामुळे त्याला मी ओळखत असण्याचा संबंध येत नाही. माझ्या बर्थडे वेळी मी पहिल्यांदा त्याला पाहिले. हजारो समर्थक शुभेच्छा द्यायला आले होते, त्यात तो एक होता. मी गुन्हेगारांचं उदात्तीकरण कधी करणार नाही. असे म्हणत त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.